२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
कुडाळ :
आंबेरी येथील प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष व नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
आंबेरी येथील प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव मंडळ आंबेरी वरची वाडी येथे नवरात्रौत्सवात दुर्गा देवीचे पूजन केले जाते. यावर्षी या मंडळाला २५ वर्षे पूर्ण होत असून या ‘रौप्य महोत्सवी वर्षा’ निमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०८ वा. देवीचे आगमन, सकाळी ११ वा. देवीची पूजा, दुपारी ०१ वा. देवीचा महाप्रसाद, सायं. ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा प्रसाद आमडोसकर, ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा. दांडिया, गरबा.
मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७.३० वा. देवीची आरती, त्यानंतर सुमधुर भजन – बुवा मंगेश नलावडे, रात्री १० वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग.
बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७ वा. देवीची आरती, सायं. ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा श्री. समीर मुणगेकर, रात्री ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा. दांडिया, गरबा.
गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ०७ वा. देवीची आरती, सायं. ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा ऋषिकेश गावडे, ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा. दांडिया, गरबा.
शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७ वा. देवीची आरती, सायं. ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा हर्षद धबळ, रात्री ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा. दांडिया, गरबा.
शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७ वा. देवीची आरती, ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा अमित डिचोलकर, रात्री १० वा. दत्तमाउली दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग.
रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७ वा. आरती, ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा श्री. महेश नाईक, रात्री ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा. दांडिया, गरबा.
सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७ वा. आरती, ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा श्री. चेतन मांजरेकर, रात्री ०९ वा. स्पर्धा, रात्री १० वा. दांडिया, गरबा.
मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सकाळी ०९ वा. होम हवन विधी, सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ०१ वा. श्री सत्यनारायण आरती, दुपारी १.३० वा. देवीचा महाप्रसाद. दुपारी ३ वा. श्री देवी चामुंडेश्वरी महिला फुगडी मंडळ काविलकाटे, कुडाळ यांचा फुगडीचा कार्यक्रम, सायं. ०६ वा. स्थानिक ग्रामस्थांची सुमधुर भजने, सायं. ०७ वा. देवीची आरती, रात्री ८ वा. हळदीकुंकू, रात्री १० वा. दशावतार नाटक.
बुधवार दि. ०१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ७ वा. देवीची आरती, ७.३० वा. सुमधुर भजन – बुवा श्री. बादल चौधरी सोबत खेळ पैठणीचा, रात्री १० वा. दांडिया, गरबा.
गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ सकाळी ०७ वा. देवीची पूजा, सायं. ०४ वा. देवीची आरती, सायं. ७.३० वा. देवीचे विसर्जन.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्ले बॉईज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

