You are currently viewing विरामचिन्हे (बाल कविता)

विरामचिन्हे (बाल कविता)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम बालकविता*

 

*विरामचिन्हे ( बाल कविता )*

 

अर्थपूर्णतेची झूल

शब्दांनी पांघरली

त्यासाठी भाषेत

विरामचिन्हे अवतरली

 

स्वल्प आणि अर्धविराम

वाक्ये तोडतात ( , )

संयोग चिन्ह मात्र

दोन शब्द जोडतात ( – )

 

भाव दर्शविण्यासाठी

वेगळी चिन्हे वापरतात

उद्गार किंवा प्रश्न

खुणेतून उभे करतात

 

उभा दंड व्यक्त करतो

आश्चर्य अन उदगार (! )

प्रश्नचिन्ह राहते

कायम यादगार (? )

 

संवादासाठी येते

चिन्ह अवतरण ( ” )

कंस स्पष्ट करतो

शब्दांचे स्पष्टीकरण ( )

 

काकपद,अवग्रह (SS)

अपसरण( -) आणि संयोग (—)

आता कुठे दिसण्याचा

फारसा येत नाही योग

 

अर्थपूर्ण चिन्हे हीं सारी

परकीयांकडून उचलली

समृद्ध करत भाषेला

या लिपीत मिसळली

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

@ सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

प्रतिक्रिया व्यक्त करा