You are currently viewing भाजप किसान मोर्चा तर्फे श्री.रामेश्वर मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व वृक्ष लागवड

भाजप किसान मोर्चा तर्फे श्री.रामेश्वर मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व वृक्ष लागवड

कुडाळ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप किसान मोर्चाच्या वतीने कुडाळ तालुक्यातील तेर्से बांबर्डे येथील पांडवकालीन श्री रामेश्वर मंदिरात विशेष पूजा अर्चा करण्यात आली. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी देवाला साकडे घालण्यात आले. यानिमित्ताने मंदिर परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आली.

या कार्यक्रमाला भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री. उमेश सावंत,जिल्हा सरचिटणीस श्री. गुरुनाथ पाटील, श्री. महेश संसारे, सौ. ज्योती देसाई, मंडळ अध्यक्ष श्री. वैभव शेणई, श्री. महादेव सावंत, जिल्हा चिटणीस श्री. सूर्यकांत नाईक, श्री. अंकित आजगावकर, मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, श्री. रुपेश कानडे, सरपंच श्री. परब तसेच अन्य भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “सेवा पंधरवड्या”च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी व नमो किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही, त्यांना तो मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच इतर शासकीय योजनांचा लाभही शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी किसान मोर्चा कटिबद्ध आहे, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा