You are currently viewing वेंगुर्ल्याचा सुपुत्र कलर्स मराठी वरील संत बाळूमामा मालिकेत….

वेंगुर्ल्याचा सुपुत्र कलर्स मराठी वरील संत बाळूमामा मालिकेत….

वेंगुर्ला
संत चरित्रावर आधारित संत श्री बाळू मामा ही मालिका गेली काही वर्षे कलर्स मराठी वाहिनीवर सुरू आहे. यामध्ये वेंगुर्ल्याचा सुपुत्र सौरभ प्रदीप माळवदे याने दमदार एन्ट्री केली आहे.सौरभला लहानपणापासूनच अभिनय, गायन, मिमिक्री ची आवड होती. त्याने लहानपणी अनेक वेशभूषा स्पर्धेमध्ये काम केले आहे त्यात अलकनिरंजन, धनगर अशा विविध भूमिका त्याने केल्या आहेत .तसेच महाविद्यालयामध्ये सुद्धा अनेक वेशभूषा स्पर्धा, गायन, मिमिक्री, नृत्य अशा स्पर्धेमध्येही त्याने सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले आहे.

यापूर्वी त्याने झी मराठी वाहिनीवरील गाव गाता गजाली या मालिकेतही काम केले आहे तसेच सावधान इंडिया या मालिकेतही त्याचा छोटासा सहभाग पहायला मिळाला. त्याने विविध नाट्यमंडलामध्येही काम केलेयापूर्वी त्याने झी मराठी वाहिनीवरील गाव गाता गजाली या मालिकेतही काम केले आहे तसेच सावधान इंडिया या मालिकेतही त्याचा छोटासा सहभाग पहायला मिळाला. त्याने विविध नाट्यमंडलामध्येही काम केले आहे त्याने आतापर्यंत एकूण ६ नाटकांमधून आपली कला सादर केली आहे. बाळूमामा या मालिकेत येत्या आठवड्यात त्याचा चक्क बाळू मामा सोबत काम असल्याने सर्वांनी आवर्जून पहा

प्रतिक्रिया व्यक्त करा