You are currently viewing अशक्य आहे विसरणे तुला

अशक्य आहे विसरणे तुला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अशक्य आहे विसरणे तुला*

 

लुकलुकणारे सुंदर डोळे

भुरळ घालती क्षणात ग

मागून येऊन घट्ट झाकतो

स्वप्न पहातो *दुर्मिळ ग*

//1//

भुरभुर उडणारे कुरूळे केस

कसे आवरावे नाही कळत

तूही भोळी *कविताराणी*

नुसती बसलीस तोंड बघत

//2//

गुलाब फूल घालून केसात

दिसतेस सुंदर “प्रत्यक्षाहुन”

काय खुणावतात बोलके डोळे

सर्व कळते तुज *हास्यातून*

//3//

हसत रहा तू नेहमी सारखी

आनंद होतो *मनापासून*

नाही राखत *हातचे काही*

खूप शिकलो *तुझ्याकडून*

//4//

वृत्ती *अभ्यासू* तुझी सखे

आजतागायत *अनुभवली*

दमून गेलीस कविता करून

म्हणून मजला गावी लागली

//5//

रूप तुझे मी नाही विसरलो

विसरलो होतो *मी मजला*

आरशात काय स्वप्नात सुध्दा

अशक्य आहे विसरणे तुला

//6//

 

विनायक जोशी🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा