You are currently viewing माझ्या स्वप्नात सजते..

माझ्या स्वप्नात सजते..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझ्या स्वप्नात सजते..*

 

आले गेले, किती ऋतू आले गेले

पण पुरे नाही झाले कधी स्वप्नांचे झमेले…

किती गोड दिसते तू, किती गोड हासते तू

तुझे अधर भासती जणू मधू अमृताचे पेले…

 

कळी होऊन फुलते फूल होऊन झुलते

का ग येऊन स्वप्नात मज डोळे मिचकावते

फांदी फांदी बहरावी लहरते वाऱ्यावर

बंद डोळ्यांनी मारून टपली अवचित जाते..

 

जणू नशा तू चढते मनी घुटमळते घुटमळते

तोल जातो अवचित मग नशा उतरते

तू फुलते फळते मोहरते अंगोपांगी

तळहातावर जणू लाल मेहेंदी रंगते..

 

कुण्या राजाची होऊन राणी मागे वळून पाहते

आणि रोज रोज मग माझ्या स्वप्नात सजते…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा