आम्हा साफसफाई कर्मचाऱ्यांचे दुःख समजून घेऊन सहकार्य केलेल्या प्रशासनाचे व जनतेचे मनःपूर्वक आभार- बाबू बरागडे
सावंतवाडी
खऱ्या अर्थाने आम्ही या शहराचे स्वच्छता दूत आहोत परंतू गेल्या चार वर्षापासून आम्ही 70 साफसफाई कामगार आमचे जवळपास 65 लाख हून अधिक आमच्या कष्टाचा व हक्काचा भविष्य निर्वाह निधी मिळावा त्या साठी आम्ही गेली चार वर्ष न्याय मागत आहोत.
आमचा भविष्य निर्वाह निधी ठेकेदारासह लुटणारी एक साखळी आहे आणि त्या साखळीत आम्ही 70 कामगार अडकलेलो आहोत आणि त्या साखळीतून बाहेर काढण्यासाठी येत्या पंधरा दिवसात आमची कामगार संघटना,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या परम कष्टातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत व आम्हाला न्याय मिळेल याची आम्हा सर्व सफाई कामगारांना पूर्ण खात्री आहे.
शहरातील सर्व जनता पाहते आम्ही रोज घाणीत काम करतो त्या घाणीमुळे दुपारचं जेवण देखील पोटात जात नाही.
आम्ही देखील माणूस आहोत आमच्या मुला बाळाचे शिक्षण व कुटुंबाचा जीव जगवण्यासाठी हे काम आम्ही कुठचीहि तक्रार न करता करतो आणि ते आमच्या कष्टाचे पैसे हे ठेकेदार खातात असतील तर ते योग्य नाही जर आज असा आम्हाला त्रास दिला तर यापुढे हे घाणीचं काम भविष्यात कोणीही करायला तयार होणार नाही असं आज मला वाटत.
एकच विनंती आहे प्रशासनाला आंम्ही गोरगरीब साफसफाई कामगारांचे या पुढे असे हाल होऊ नये यासाठी प्रशासनाने अशा फसव्या व अत्याचारी ठेकेदारांकडून आमच्या कष्टाची कमाई आम्हाला मिळवून देऊन यापुढे आम्हाला निलंबित करण्याची भाषा वापरणाऱ्या अशा ठेकेदारांना या शहरातून प्रशासनाने व येथील जनतेने त्यांचे कायमस्वरूपी निलंबित करून आम्हाला गरीब साफसफाई कामगारांना न्याय मिळवून द्यावा तोचं आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल असे प्रखड मत कामगार संघटनेचे लीडर बाबू बरागडे व साफसफाई कर्मचाऱ्यांनी मांडले.
आमच्या आंदोलनामुळे शहरातील जनतेला थोडा फार त्रास झाला असेल परंतु आमच्या वेदना त्याच जनतेला माहित आहे ज्यांच्या सेवेसाठी आम्ही नेहमीचं त्यांच्या घरी पोहोचतो.
ठेकेदार यांच्या बद्दल आमच्या मनात विनाकारण जरा सुद्धा वाईट भावना नाही परंतु आमच कुटुंब,आमच्या मुलाबाळांचे शिक्षण, वृद्ध माता-पित्याच्या औषध- पाण्याचा खर्च या सर्व रोजच्या गरजा भागवण्यासाठी आमच्या कष्टाच्या व घामाच्या पैशासाठी आम्हाला आज झगडावत लागत आहे हे फार मोठ दुःख आहे हे आमचं दुःख पाहण्यासाठी ठेकेदार आपणास वेळ मिळाल्यास एकदा तरी आमच्या घरी येऊन आमची परिस्थिती पाहावी असं भावनिक हाक येथील सर्व गोरगरीब साफसफाई कामगारांनी ठेकेदाराला मारली आहे.

