You are currently viewing कणकवली उड्डाणपूल वाहतुकीस खुला…

कणकवली उड्डाणपूल वाहतुकीस खुला…

कणकवली

कणकवली शहरातील उड्डाणपूल आज पासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. उड्डाणपुलाखालील सपोर्ट चार दिवसापूर्वी हटविण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळपासून उड्डाण पुलाच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्या आहेत.
गेली दोन वर्ष शहरातील उड्डाण पुलाचे काम सुरू होते. गतवर्षी मे अखेरीस या पुलावरून वाहतूक सुरू होणार होती. मात्र कोरोना चा प्रादुर्भाव आणि त्यानंतर उड्डाणपुलाचे कोसळलेले बांधकाम यामुळे या पुलाच्या बांधकामास विलंब झाला होता. दरम्यान शहरातील एस एम हायस्कूल परिसरात उड्डाणपुलाची जोड भिंत गतवर्षी जुलै महिन्यात कोसळली होती. तेथे नव्याने बांधकाम करण्याचे आदेश कनकवली प्रांताधिकाऱ्यांनी हायवे प्रशासन आणि ठेकेदाराला दिले होते. मात्र कोसळलेल्या भिंतीची डागडुजी करून उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + eighteen =