You are currently viewing आनंदाचा वंशविस्तार…!!

आनंदाचा वंशविस्तार…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आनंदाचा वंशविस्तार…!!*

 

दुस-यांना आनंद वाटण्यापेक्षा

स्वतःचं आनंदाच झाडं बनं

कर तू आनंदाची पानगळती

सोहळ्यांत.. गा तुझं पसायदान

 

माणसांच्या डोळ्यांतला..अलगद

तू ..कोंडलेला पाऊस काढून घे चंद्राची दुसरी बाजू अंधारलेली

तू त्यांना..अंधारातून प्रकाशाकडे ने

 

पेहराव आनंदाचा घालून

घराचं…. मंदीर कर

देवाला करू दे विश्राम

कर ..आनंदाचा वंशविस्तार…

 

आनंदाच्या चैतन्यमय सोहळ्यांत

रंगेल …आनंदविभोर रिंगण

आकांक्षाच्या ..बिया पेर

मोकळ कर ..तुझं अंगण..

 

नश्वर आयुष्याची

अक्षरं कर..

आनंदाच्या कवितांचा

वंशविस्तार कर…..!!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा