You are currently viewing दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग यांच्यावतीने मसुरे केंद्रातील शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग यांच्यावतीने मसुरे केंद्रातील शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप

मसुरे :

*’एक छत्री गरजू विद्यार्थ्यांसाठी’* या उपक्रमांतर्गत दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग यांच्या वतीने मसुरे केंद्रातील मसुरे देऊळवाडा , मसुरे कावा, मसुरे खाजनवाडी, मसुरे मागवणे व मसूरे नं.१ या शाळांमधील २० गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी दुर्गा मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश नाईक सर, श्री. प्रसाद सुतार सर यांनी विशेष सहकार्य केले. होतकरू विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल मसुरे केंद्रातील शिक्षकांच्या वतीने श्री. प्रशांत पारकर, सौ. सुखदा मेहेंदळे, सौ. सुजाता मडवळ, सौ. शर्वरी सावंत, सौ. संजीवनी प्रभू तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी प्रतिष्ठानचे धन्यवाद व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 1 =