You are currently viewing जे न देखे रवी

जे न देखे रवी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जे न देखे रवी*

 

शब्द सामर्थ्य अफाट

जे न देखे कधी रवी

उतरवतो लेखणीतून

शब्द विश्वाचा तो कवी….

 

चंद्र सूर्य तारांगण

असते त्याच्या मुठीत

सरिता अन् वा-याचे

गीत रचतो तो लयीत…

 

माती आभाळाचे नाते

सांगे पाऊस धारेत

घन शुभ्र कधी काळे

बरसती लेखनमाळेत..‌

 

अंधार व उजेडाची

सम साधतो झोकात

सांज आनंदते दारी

लावताच सांजवात…

 

सुखदु:खाचे प्रसंग

विणतो शब्दधाग्यात

सकारात्मक पेरता बीज

येतं डोलत काव्यात..

 

 

कल्पना कवीचे जीवन

शब्द त्यांचे पंचप्राण

हरवून जातो स्वतः ला

साहित्य जगतो महान …!!

 

०००००००००००००००००

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा