महासंघाचे मुख्य प्रवर्तक ऍड. उमेश सावंत यांचे आवाहन
कणकवली
कोणतेही वैयक्तिक आमंत्रण नसताना केवळ मी कणकवली कॉलजचा विद्यार्थी आहे . या आत्मियतेच्या भावनेने आज येथे एवढ्या संख्येने तुम्ही एकत्र आलात. आज बीज रोवले आहे . त्याचे वटवृक्षात रुपांतर करूया. इतक्या वर्षात खरं तर आधीच व्हायला हवे होते. परंतु आमची इच्छाशक्ती अनंत आहे, म्हणूनच माजी विद्यार्थ्यांचा महासंघ स्थापन होत आहे. कणकवली कॉलेज हा दुवा मानून आतापर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महान कार्य करूया, असे आवाहन महासंघाचे मुख्य प्रवर्तक ऍड . उमेश सावंत यांनी येथे केले.
कणकवली कॉलेजच्या आतापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने माजी विद्यार्थी महासंघ स्थापन करण्याच्यादृष्टीने माजी विद्यार्थ्यांची सहविचार सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी कॉलेज मैदानावरील श्री देव शिवारा मंदिरात गाहाणे चालण्यात आले. त्यानंतर कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात अॅड. उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी प्राचार्य डॉ . राजेंद्र चौगुले, प्रा . मंगलदास कांबळे, अमोल खानोलकर, अभय साडपकर, प्रा . हरिभाऊ मिसे, राजन पारकर, मंदार सापळे, स्वानील वळंजू संजय मालंडकर, लक्ष्मीकांत मावे आदी उपस्थित होते.
प्रारंभी कणकवली कॉलेजच्या वाटचालीतील माजी आम . के केशवराव राणेचा नामोल्लेख करून दिवंगत विद्यार्थी, शिक्षक, संचालक आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. भिसे व अभय खडपकर यांनी प्रास्ताविकात महासंघ स्थापन करायामागची उद्दीष्ट, कार्य, घाटनेत काय अपेक्षित आहे . याबाबत मार्गदर्शन केले. अँड . सावंत पुढे म्हणाले, या कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी मोठ मोठ्या प्रशासकीय, राजकीय पदावर पोहोचले आहेत. आज माझ्यापेक्षा ज्येष्ट विद्यार्थी येथे उपस्थित असतानाही मला या अध्यक्षपदाचा मान घेताना आनंद होत आहे. राजकीय क्षेत्रापासून हा महासंघ अलिप्त असला तरी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या अनुभवाचा, त्यांचा मार्गदर्शनाचा आपण लाभ घेऊया , आपापसात मदत करून ही माजी विद्यार्थ्यांची मोट पुढे नेण्यासाठी कॉलेजचा दुवा वापरून सर्वांनी एकत्रित येऊया.
प्राचार्य डॉ . चौगुले म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ कॉलेजच्या परीक्षा कणकवली कॉलेजमधून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या . जिल्ह्यातील दोन कॉलेजमधील हे एक लीड कॉलेज आहे. कॉलेजच्या आवारातील २५ राऊटरद्वारे विद्याथ्यांना ऑनलाईन शिक्षण , परीक्षा देण्याचे काम या कॉलेजने केले. २०२३ – २४ मध्ये नॅक समिती येईल, त्यावेळी या महासंघाला मिळालेला प्रतिसाद पहाता कॉलेजचे नाव निश्चितच आणखी पुढे जाईल, यात शंका नाही. अमोल खानोलकर यांनी संस्था नोंदणी करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, सदस्य कोण होईल याबाबत मार्गदर्शन करून विचार मांडण्याचे जावाहन केले. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध सूचना केल्या.
यात प्रवीण पारकर यांनी वृद्धांसाठीही उपक्रम राबवा अशी सूचना केली. तसेच सांस्कृतिक प्रबोधन करा, महिला सक्षमीकरण करा, कलाकार घडवा अक्तिमत्व विकास प्या, स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घ्या, मुलाना इटर्नशीपसारखे प्रॅक्टिकल ज्ञान द्या, मालवणी भाषेला प्राधान्य नुकतेच नेपाळला झेंडा रोवणाऱ्या गौरव राणेसारख्या विद्यार्थ्याना आयकॉन बनवा आदी अनेक सूचना करण्यात आल्या. यात माई परब, बांदेकर, अनंत हजारे, उपपणा मोर्ये, अँड. विलास परब, प्रियांका लोकरे, डॉ . गाइ, सुशिल सावत, शैली सावंत, संजय राणे, सुहास वरुणकर, राजेंद्र वर्ण, कन्हैया पारकर, बंडू हर्णे, पांडू रासम आदी अनेकानी सहभाग घेतला.
प्रा . प्रमोद कोरगांवकर यांनी महासंघाच्या कामात सातत्य रहावे. महासंघाचा सदस्य करताना तो माजी विद्यार्थी कॉलेजसाठी काय योगदान देऊ शकतो, याचीही नोंद ठेवावी, अशी सूचना केली. यावळी आजीव सभासद, सर्वसाधारण सभासद शुल्क किती ठेवावे याबाबत चर्चा करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या महासपाची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले . प्रा . भिसे यांनी आभार मानले.