*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घराचं ऋण आहे माझ्यावर…!!*
सुंदर नाते घराशी
क्षणार्धात बोलके होते
चिमूटभर मातीत बागेच्या
पसायदानाची पणती पेटते
आतबाहेर काही नको
उरला एकचं कप्पा
दाराबाहेर माझ्या घराच्या
स्वागत करणारा देवबाप्पा..
आईबाबा गेल्याचं दुःख
चेह-यावर घराच्या नाही
घराचं ऋण माझ्यावर
बोलून दाखवत नाही…
घराकरता कमी पडलो
शल्य आहे उरी
विरक्त होत गेलो
ओझी अपेक्षांची दारी..
घर..घर खेळता खेळता
पहिल्यापासून जगावसं वाटतं
घराकरता काळीज अंथरायला
आईबाबांसोबत फुलायचं होतं
काट्यांत असुनही गुलाब
माझ्या घराकरता कण्हतो
आयुष्याची वाट चालताचालता
माझ्याकरता गाणं म्हणतो…
बाबा ठाकूर

