You are currently viewing तुळसला रंगणार राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेची मेजवानी

तुळसला रंगणार राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेची मेजवानी

भाजप प्रदेशाध्यक्ष चषकासाठी दोन दिवसीय संगीत सोहळा; विजेत्यांसाठी २१ हजार रोख व आकर्षक पारितोषिके

 

वेंगुर्ले :

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस येथे १९ व २० सप्टेंबरला “राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा प्रदेशाध्यक्ष चषक” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील निमंत्रित नामवंत भजन संघ सहभागी होणार आहेत. तर विजेत्या प्रथम क्रमांक संघास रोख २१ हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या सह विविध सांघिक आणि वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

वैभव होडावडेकर मित्रमंडळ, भारतीय जनता पार्टी तुळस व भा.ज.यु.मो. वेंगुर्ला आयोजित ही स्पर्धा भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आली आहे. दोन दिवस चालणारी राज्यस्तरीय ही भव्य दिव्य संगीत निमंत्रित भजन स्पर्धा उत्सव हॉल तुळस येथे होणार आहे. स्पर्धेत आकर्षक बक्षिसे सोबत प्रेक्षकांची भोजन व्यवस्था, उपस्थित प्रेक्षकांमधून भाग्यवान प्रेक्षक यांना भेटवस्तू देण्यात येणार असून दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनप्रेमीना मंत्रमुग्ध करणारी संगीत भजनाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धा परीक्षक दिप्तेश मेस्त्री, मनीष तांबोसकर यांचा संगीत कार्यक्रम होईल.

दरम्यान स्पर्धेत विजेत्यांना प्रथम पारितोषिक – २१ हजार व चषक, द्वितीय पारितोषिक – १५ हजार व चषक, तृतीय पारितोषिक – ११ हजार रु. व चषक, उत्तेजनार्थ प्रथम – ७ हजार रु. व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय – ५ हजार रु. चषक, उत्तेजनार्थ तृतीय – ३ हजार रु. व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट गायक – १ हजार रु. व चषक, उत्कृष्ट पखवाज – १ हजार रु. चषक, उत्कृष्ट तबला – १ हजार रु.व चषक, उत्कृष्ट कोरस – १ हजार रु व चषक, उत्कृष्ट झांजवादक – १ हजार रु. व चषक, शिस्तबद्ध संघ – १ हजार रु. व चषक, उत्कृष्ट हार्मोनियम – १ हजार रु. व चषक, उत्कृष्ट गजर – १ हजार रु. व चषक, उत्कृष्ट गौळणी – १ हजार रु. व चषक, उत्कृष्ट पखवाज तबला जुगलबंदी – १ हजार रु. व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी जास्तीत-जास्त भजन रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा