सावंतवाडी :
मराठा समाजाच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्यासाठी माझा नेहमीच पुढाकार असेल. समाजाने मला कधीही हाक मारावी, मी मदतीसाठी पुढे राहीन अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी येथे दिली. रविवारी सावंतवाडी अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित मराठा व्यावसायिक मेळावा तसेच जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संजू परब यांच्या हस्ते सावंतवाडी संचयनी पॅलेस येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून संजू परब, रूपेश राऊळ हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अनावरण झाले.
या मेळाव्याला ॲड . सुहास सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड यांनी व्यावसायिक उपक्रम माहिती, योजना आणि मराठा उद्योजक डिरेक्टरी ऍपची माहिती दिली. या ऍपच्या माध्यमातून सर्व मराठा व्यावसायिकांना एक व्यासपीठावर आणून उद्योग वाढीसाठी चालना मिळेल आणि बाजारपेठांमधील मराठा व्यावसायिकांची ओळख समाजाला होईल जेणेकरून त्यांची आर्थिक उन्नती होईल याबाबत मार्गदर्शन केले. उद्घाटक संजू परब यांनी पक्षभेद विसरून राजकारण, पक्ष वेगळे असले तरी प्रथम समाजाला प्राधान्य देत या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी आपण सहभाग नोंदवू अशी भावना व्यक्त केली. मराठा समाजातील विविध व्यवसायिकाचे ॲप काढले आहे. ही बाब कौतुकास्पद आहे परंतु आपण ग्राहकांना चांगली सेवा दिली पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी आपले नेहमी सहकार्य राहील जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुहास सावंत हे समाजाच्या उन्नतीसाठी चांगले काम करीत असल्याचे परब म्हणाले. शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी या मेळाव्यात आभार मानले. यावेळी सावंतवाडीतील मराठा व्यावसायिक बांधव उपस्थित होते. शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख (उबाठा) रूपेश राऊळ, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत, मराठा महासंघ सचिव वैभव जाधव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष परब, अशोक दळवी, नारायण राणे, दिनेश गावडे, आशिष काष्टे, संजय लाड, मनोज घाटकर, प्रसाद राऊळ, अभिजित सावंत, नंदू विचारे, शैलेश घोगळे, अनुपसेन सावंत, योगेश काळप, विजय देसाई, प्रवीण परब, उद्योजक राणे, प्रशांत दळवी, सिद्धेश टीळवे, वगैरे मराठा व्यावसायिक व बांधव उपस्थित होते.

