*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हळवं मन*
************
*मनात खूप काही असतं पण*
*मनातलं सांगता येत नाही*
*मन अस्वस्थ झालं की*
*मन कुठेच लागत नाही*
*साठवून तरी किती ठेवायचं मनात*
*मन मोकळे कुठे करावं प्रश्न पडतो*
*नकळत वेदना मिळाल्या की*
*मनातल्या मनात गुंता वाढतो*
*मनाची घालमेल झाली की*
*मन उदास होत असते*
*गहिवरून आलेलं मन*
*कुणाला कळत नसते*
*मन खूपच हळवं असतं*
*वेदना सहन होत नाही*
*सहानुभूती असली तरी*
*ओरखडा बरा होत नाही*
*स्वत:चीच समजूत काढताना*
*स्वत:चं सांत्वन करून घ्यायचं*
*अश्रुंना आवर घालताना*
*एकांतात जाऊन बसायचं*
*मन शांत झालं की*
*पुन्हा नव्याने जगायचं*
*मनाचे मनाशी जुळवून घेताना*
*स्वतःला मात्र हसत ठेवायचं*
*खरंतर या हळव्या मनावर*
*कसलीच जखम नसावी*
*असली तरी आपणचं आपली*
*हळुवार फुंकर घालावी*
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

