You are currently viewing भाजपा सावंतवाडी विधानसभे च्या वतीने काँग्रेसचा निषेध : मातृशक्तीचा सन्मान!

भाजपा सावंतवाडी विधानसभे च्या वतीने काँग्रेसचा निषेध : मातृशक्तीचा सन्मान!

*भाजपा सावंतवाडी विधानसभे च्या वतीने काँग्रेसचा निषेध : मातृशक्तीचा सन्मान!*

*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबाबत चुकीचे विधान केलेबाबत काँग्रेस चा निषेध !!!*

ज्या भारतीय संस्कृतीने ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे सांगून मातृशक्तीला सर्वोच्च स्थान दिले, त्याच संस्कृतीचा मान राखत आपण सर्वजण एकत्र उभे आहोत. मात्र, काही राजकीय विचारधारांनी या पवित्र नात्यावर आघात करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असले तरी, ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मातेबद्दल अपशब्द वापरणे, किंवा त्यांच्याबद्दल चुकीची चित्रे रेखाटणे, हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर, देशातील समस्त मातृशक्तीचा अपमान आहे.

काँग्रेसने बिहार निवडणुकीच्या निमित्ताने द्वेष पसरवून मातृशक्तीचा अपमान केला, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. महिला मोर्चा सावंतवाडी विधानसभेच्या भाजपा महिला मोर्चा च्या वतीने या निषेधार्थ आयोजित कार्यक्रमात आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या या विचारधारेचा निषेध केला. मातृशक्तीचा सन्मान करणे, हे आपल्या संस्कृतीचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडू असे प्रतिपादन भाजपा महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर यांनी या निषेध आंदोलनाच्या वेळी केले .
सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात जिल्हा सरचिटणीस महेश सारंग , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण , जिल्हा चिटणीस महेश धुरी व सुधीर दळवी , बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर , आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ , सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर , दोडामार्ग मंडल अध्यक्ष दिपक गवस , महीला मोर्चाच्या मोहीनी मडगांवकर – सुजाता पडवळ – वृंदा गवंडळकर – चेतना रजपूत – मेघना साळगांवकर – दिपाली भालेकर – सुनयना काटकर – प्राजक्ता केळुसकर – मेघा भोगटे – वंदना किनळेकर – समिधा नाईक – सावित्री पालेकर , निलेश सामंत , मनवेल फर्नांडिस , अशोक सावंत , शितल राऊळ , साईप्रसाद नाईक , सुहास गवंडळकर , संतोष नानचे , उमेश पेडणेकर , चंद्रकांत मळीक , रविंद्र मडगांवकर , अजय गोंधावळे , बाळा आकेरकर , संजु शिरोडकर , दिलीप भालेकर , अँड. परिमल नाईक , पंकज पेडणेकर , बाळु शिरसाठ , प्रमोद गावडे , दादा परब , मधुकर देसाई , वसंत तांडेल , रमेश दळवी , आनंद नेवगी , देवेंद्र शेटकर , पराशर सावंत , प्रणव वायंगणकर , संदिप नेमळेकर , प्रवीण देसाई , निलेश पास्ते , आनंद तळणकर , राजबा सावंत , हनुमंत पेडणेकर तसेच सावंतवाडी विधानसभेतील जिल्हा पदाधिकारी , जि.का.का.सदस्य , मंडल पदाधिकाऱ्यांसह विविध मोर्चा / आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा