*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा.सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आपल्यातच गुप्त सारे*
जे प्रत्येकाला मिळावं
असं आहे प्रत्येकात
गुप्त केलं किमतीच्या
दिमतीला विवेकात ।।१।।
फुकटाची असते का
कधी किंमत अपार
समाधान होते का
कधी मनी बेसुमार ।।२।।
संयमाने अभ्यासाने
उपायाने कल्पनेत
सुविचारे सत्यतेने
शिस्तिले ते साधलेत ।।३।।
गुप्त कळा गुप्त काळा
चिंतनाने शिक बाळा
तुझं आहे तुज पाशी
संयमित कलामुळा ।।४।।
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.वेंगुर्ला.
जि. सिंधुदुर्ग, राज्य महाराष्ट्र.

