*ज्येष्ठ गझलकारा सुनंदामाई पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम गझल*
*मैफल वेडी सजते अजुनी*
नभात आहे वीज खरोखर दिसते अजुनी
क्षितिजावरती वसुंधरेला छळते अजुनी
नकोस बदलू कूस अचानक भल्या पहाटे
शृंगाराच्या गंध फुलांवर झुलते अजुनी
गुलाब चाफा तूच मोगरा बनून यावे
जुई कधीची फांदीवरती रुसते अजुनी
ओठामधले शब्द उचलण्या आतुरले मी
मंद दिव्यांची मैफल वेडी सजते अजुनी
होकाराच्या शब्दाची मी वाट पहाते
अद्वैताचे नवे निरांजन जळते अजुनी
रोज पहाटे तुझ्या मिठीचे स्वप्न बघावे
गात्रांमध्ये गझल सुखाची फुलते अजुनी..
ओठांवरती ओठ ठेवण्या आतुर झाले
मी रात्रीशी लाडिक हितगुज करते अजुनी..
*गझलनंदा*
8422089666

