You are currently viewing मुंबईत कविवर्य ना. धों. महानोर साहित्य व शेती-पाणी पुरस्कार विजेते घोषित

मुंबईत कविवर्य ना. धों. महानोर साहित्य व शेती-पाणी पुरस्कार विजेते घोषित

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ना. धों. महानोर यांच्या स्मरणार्थ सुरू झालेल्या साहित्य व शेती-पाणी पुरस्कारांचे दुसरे वर्ष यंदा साजरे होत आहे. यंदाच्या विजेत्यांची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. येत्या २६ सप्टेंबर रोजी मुंबईत, यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा होणार आहे.

शेती-पाणी विभागात साधना उमेश वर्तक (पालघर) आणि कुसुम सुनील राहसे (नंदुरबार) यांची निवड झाली आहे. तर साहित्य विभागात अविनाश पोईनकर (चंद्रपूर), वैभव देशमुख (बुलढाणा), सुचिता खल्लाळ (मराठवाडा) आणि हिना कौसर खान (पुणे) यांना सन्मान मिळणार आहे.

या पुरस्कारार्थ्यांची निवड अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंढे, शंभू पाटील, अजित भुरे आणि पत्रकार रमेश जाधव यांच्या समितीने केली. राज्यभरातील साहित्य व शेती-पाणी क्षेत्रातील कार्याचा सखोल आढावा घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. या पुरस्कारांमुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनाही व्यासपीठ मिळत असून साहित्य व समाजकार्य क्षेत्राचे लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा