You are currently viewing भोसले नॉलेज सिटीमध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन..

भोसले नॉलेज सिटीमध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन..

_*भोसले नॉलेज सिटीमध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन….*_

सावंतवाडी

_“फादर ऑफ इंजिनियरिंग” भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा अभियंता दिन यावर्षीही भोसले नॉलेज सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा या कार्यक्रमाचे अकरावे वर्ष आहे. सोमवारी सकाळी ११ वा.बीकेसी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकामचे नि.कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित राहणार असून, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले अध्यक्षस्थानी असतील._

_अभियंता दिनाच्या निमित्ताने संस्थेमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीही अनेक स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय कॉम्प्युटर विभागातर्फे विशेष क्वीझ कॉम्पिटिशन व लोगो डिझाईन स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डिप्लोमा सिव्हिल विभागप्रमुख प्रा.प्रसाद सावंत व डिग्री मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.स्वप्नील राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी वर्ग मेहनत घेत आहे._

प्रतिक्रिया व्यक्त करा