*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऋण गतजन्मीचे*
नेहमीच तुम्ही मजेत,
असे बोलता.
पण त्यामागे असतो एक खेद युक्त स्वर.
समोर न राहूनही
कळते सारे,
कसे वाहतात,
मतलबी वारे.
दुःख मनीचे ,
मनात गिळूनि
वर पांघरती
ढाल शालीची.
वरवरचा
आव आणिती,
वेळ येता सारे
मुखवटे गळून पडती.
मेटाकुटीला जीव येता
कशास ते ओढून घेता,
आपले परके कोण ते
ज्यांना न काही कळता.
संसार मोडून स्वतः चा
कां लष्कराच्या
भाकर्या भाजता
खंजीर कधी तो पाठीत घुसता.
कळेल केंव्हा, तुज मानवा
जग ओळखायला शीक.
स्वतः च स्वतः च्या पायावरती
कुर्हाडीची घेशी भीक.
येता जाता कुणीही फसवते,
स्वार्थीपणाचे बुरखे त्यांचे
फाडुनि,आत्मशोध घे स्वतः चा
अस्तित्व शोध स्वतः चे.
कुणीही येतो तुज वाकवतो,
ओळख या स्वार्थी जगात
आता
कोण कुणाचा नसतो.
वेसण घाल आता स्वतः ला
जे तुझे हक्काचे आहे
त्याला तू दूर लोटतो,
जे तुला कधी मिळणार नाही
कां त्याच्या मागे धावतो.
अशाने उध्वस्त केलेस तू
स्वतः चे जीवन, नियतीने हा खेळ मांडला, कां करिशी ,
स्वतः चेच आत्मदहन.
का नव्हते रे सुख तुझ्या नशीबी
भोग कोणत्या जन्मीचे, उगा भोगते, तुझ्यासवे झाले पोरके कुटुंब तुझे, कां ऋण हे गतजन्मीचे.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार.

