श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.द.रा. कळसुलकर यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली .
सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या भौतीकशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक डॉ. दत्तातत्रेय रामचंद्र कळसुलकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने सावंतवाडी येथे राहात्या घरी दि.10/9/2025 रोजी निधन झाले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये 1975 ते 1981 व पुढे 1991 ते 1993 या वर्षांमध्ये त्यांनी प्राचार्य पद भूषवले होते. भौतिकशास्त्र विषयाचे ते गाढे अभ्यासक होते.
तत्वनिष्ठ,विद्वान ,उत्कृष्ठ प्राध्यापक व कुशल प्रशासक ,कडक शिस्तीचे प्राचार्य म्हणुन त्यांचा उल्लेख केला जातो.
त्यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळताना तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पुणे विद्यापीठांमध्ये डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम केले.1993 मध्ये नियत वयोमानानुसार ते महाविद्यालयातुन निवृत्त झाले होते.
त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डी.एल.भारमल , रसायनशास्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. दिलीप गोडकर तसेच महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
