पालकमंत्री नितेश राणे यांची राधाकृष्ण मंदिरातील हरिनाम सप्ताहास भेट; डोरले कुटुंबीयांना सांत्वन भेटही
कणकवली :
राधाकृष्ण मंदिर येथे आजपासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहास पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी धावती भेट देत दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीचे पदाधिकारी आप्पा पारकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बाळा वळंजू, विनोद मोदी, तन्वी मोदी, बबन हळदिवे, सिद्धेश पावसकर, सचिन तायशेटे, संजय पावसकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोज रावराणे व दिलीप तळेकर यांचा विशेष गौरवही करण्यात आला.
दरम्यान, याआधी फोंडाघाट येथील ज्येष्ठ व्यापारी नाना डोरले यांच्या निधनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन डोरले कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी बंडू डोरले यांच्यासह फोंडाघाटमधील स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
