You are currently viewing सावंतवाडी माध्य. शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वैभव केंकरे

सावंतवाडी माध्य. शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वैभव केंकरे

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी वैभव केंकरे तर सचिवपदी गोविंद कानसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झाली असून या सभेमध्ये सावंतवाडी तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे जिल्हा सचिव गजानन नानचे सल्लागार बी. डी.गोसावी इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी वैभव केंकरे कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी, सचिवपदी गोविंद कानसे मळगाव हायस्कूल, उपाध्यक्षपदी हर्षाली खानविलकर आर. पी. डी. हायस्कूल सावंतवाडी, उपाध्यक्ष महादेव जांभळे माजगाव हायस्कूल, सहसचिव रुपेश मोरजकर चौकुळ हायस्कूल ,खजिनदार रवीकमल सावंत कलंबिस्त हायस्कूल, हिशोब तपासणीस तानाजी खोत आरोस पंचक्रोशी हायस्कूल, जिल्हा प्रतिनिधी भीवा धुरी दानोली हायस्कूल, महिला प्रतिनिधी मिषेल लेमोस मिलाग्रीस हायस्कूल, सदस्य राजेंद्र बांदेकर दानोली हायस्कूल, सदस्य संदीप जाधव शिरशिंगे हायस्कूल, सदस्य संतोष राऊळ सैनिक स्कूल अंबोली, सदस्य निशिगंधा रेवडेकर विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस, सदस्य रंजन लाखे वि. स.खांडेकर हायस्कूल सावंतवाडी, निमंत्रित सल्लागार बी. डी. गोसावी मळगाव हायस्कूल, शरद देसाई डेगवे हायस्कूल ,राजेंद्र पिळणकर कोलगाव हायस्कूल, प्रवीण शिर्के इन्सुली हायस्कूल आदींची निवड करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी यांचे जिल्हा संघटने तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =