You are currently viewing नको चढवायला वरचा स्वर

नको चढवायला वरचा स्वर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नको चढवायला वरचा स्वर*

(10)

असून ताकद तुझ्यात एवढी

धर्मा धर्मात “अधर्म” माजतो

असून शेजारी कित्येक वर्षे

एकमेकांवर *लढाई* लादतो

//1//

दाखवून दे तू करीष्मा एकदा

सगळ्यांना आण *वठणीवर*

उतरवून खुमखुमी भांडणाची

डोके आण त्यांच ठीकाणावर

//2//

असून शेजारी नांदावे सुखात

कशास कालवती माती अन्नात

जन्म देऊन *माणूस* म्हणून

कलह कशाला आपापसात?

//3//

तूच बुध्दीचा आहेस वितरक

कशास ठेवतोस आपणापाशी

संचय सर्वाना *वाटून टाक*

अन्यथा त्याला येईल *बुरशी*

//4//

बाप्पा काही *सांगाचे* आहे

संकल्प केलाय आम्ही सर्वानी

लढायच नाय भांडायच नाय

सर्वांनी नांदुया गुण्यागोविंदानी

//5//

देश आपला सुजलाम सुजलाम

पिकतय धान्य जर *पोटभर*

भांडायच कशाला आपापसात

नको चढवायला वरचा *स्वर*

//6//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा