You are currently viewing शेर्लेत घराची भिंत कोसळून ८० हजारांचे नुकसान

शेर्लेत घराची भिंत कोसळून ८० हजारांचे नुकसान

शेर्लेत घराची भिंत कोसळून ८० हजारांचे नुकसान

​बांदा :

शेर्ले – सिद्धार्थ नगर येथील शंकर रामा जाधव यांच्या घराची दगडी भिंत सोमवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास कोसळली. या घटनेत दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या पत्नी आणि मुलगी बचावल्या आहेत. दगड पायावर कोसळून पायाला किरकोळ दुखापत झाली. या घटनेत जाधव कुटुंबीयांचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जाधव यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

​गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पहाटे शंकर जाधव हे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपले असताना पहाटे अचानक त्यांच्या घराची मातीची भिंत दगडी भिंतीवर पडली व त्यामुळे दगडी भिंतही कोसळली. भिंतीचे दगड त्यांच्या पत्नीच्या आणि मुलीच्या पायावर पडले. त्यामुळे दोघीही किरकोळ जखमी झाल्या.
​या दुर्घटनेत घरातील अनेक वस्तूंचे नुकसान झाले असून, जाधव यांचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीमुळे जाधव कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. शासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शंकर जाधव यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा