पिंपरी :
माझे पत्रकार मित्र मा.विवेक कुलकर्णी यांनी आपल्या वडिलांच्या स्व.दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ अविनाश वैद्य यांच्या स्नेहसदन आश्रमाला आपल्या आईच्या हस्ते *समाजदूत* हा पुरस्कार व अन्नधान्य प्रदान केले.
यावेळी वैद्य कुटुंब, जेष्ठ साहित्यिक राज अहेरराव आणि मित्र बंधू, संपादक विवेक इनामदार उपस्थित होते. घरगुती स्वरूपात हा सोहळा झाला
मा.अविनाशजी वैद्य कित्येक वर्षांपासून स्नेहसदन हा वृद्धाश्रम चालवत आहेत, ज्यात समाजाने, कुटुंबाने नाकारलेली वयोवृद्ध नागरिक आहेत.
हे वैद्य म्हणजे तेच ज्यांचा *मूर्ती आमची किंमत तुमची* हा अभिनव उपक्रम खूप प्रसिद्ध आणि अभिनव आहे.
त्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याने खरं तर *सृजन प्रतिष्ठान* च उपकृत झाले आहे

