You are currently viewing विसर्जन (वृत्त बालानंद ८+६)

विसर्जन (वृत्त बालानंद ८+६)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विसर्जन*( वृत्त बालानंद ८+६)

 

निरोप देते आज तुला

आशिष द्यावा कृपे मला ..

 

दहा दिनाचा अतिथी तू

चैतन्य किती दिलेस तू..

 

केली सेवा यथामती

जाणशील का ही भक्ती…

 

विद्यादाता तू असशी

ज्ञानी मजला तू करशी..

 

जाता जाता दूर करी

विकार सारे पार करी…

 

आहेस उभा युगे युगे

पामर आम्ही नि भणंगे..

 

अनंत वासी ब्रम्हांडी

कोहं मी तर बापूडी ..

 

निरोप कसला देते रे

अस्तित्व तुझे कायम रे ..

 

विसर्जन तुझ्या मूर्तीचे

या अज्ञानी बुद्धीचे …

 

सदा घडावा योग तुझा

नित्य निरंतर वास तुझा…

 

प्रार्थनाच ही तव चरणी

मानुन घेशी निर्वाणी..

 

राधिका भांडारकर पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा