You are currently viewing “आईच्या काळजातून” व्याख्यान व शारदाताई मुंढे यांची मुलाखत

“आईच्या काळजातून” व्याख्यान व शारदाताई मुंढे यांची मुलाखत

चिंचवड :

गणेशोत्सवाचे औचित्य साधून सावरकर प्रतिष्ठान आणि पोखरणा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार व प्रबोधनकार शारदाताई मुंढे यांच्या मुलाखतीचा तसेच ‘आईच्या काळजातून’ या विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम पोखरणा परिवाराच्या खुशबू बंगला येथे पार पडला.या व्याख्यानात शारदाताईंनी पुरातन काळातील अहिल्याबाई, जिजाऊ साहेबांपासून ते आजच्या काळापर्यंत आईच्या महानतेचा मागोवा घेत रसिकांना मंत्रमुग्ध केले. “आई आणि बाप ही दोन तीर्थक्षेत्रे ज्यांच्या घरी असतात, त्यांना कुठल्याही देवाची पूजा करण्याची गरज राहत नाही,” असे प्रभावी प्रतिपादन त्यांनी केले.

या व्याख्यानानंतर शारदाताई मुंढे यांचा जीवनप्रवास उलगडणारी मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत सुप्रसिद्ध निवेदिका, कवयित्री,कर्मयोगिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष, सौ. सीमा गांधी यांनी घेतली.

या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन सावरकर प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष महेश कलशेट्टी यांनी याबाबत माहिती दिली. मीनाताई व अभय पोखरणा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते अमित मोरे, नम्रता मोरे, चिन्मय बाजी, अक्षय टकले, आनंद ढुमने व रूपाली बाजी यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात अर्जुन पोखरणा याने गणपती अथर्वशीर्षचे सादरीकरण करून उपस्थितांना भावविभोर केले. रूही कोलगीकर यांनी आभारप्रदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा