शिवसेनेच्यावतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तर्फे देण्यात आलेला आदर्श अंगणवाडी पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-भटवाडी शाळा नं. 3 ला जाहीर झाल्याने गावाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात पुढे जात असल्याने गौरवास्पद असल्याचे उद्गार, जि. प. सदस्य राजन मुळीक यांनी काढले. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने मळेवाड-कोंडूरे शिवसेनेतर्फे अंगणवाडी सेविका समीक्षा नाईक व मदतनीस स्वराली शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. मुळीक बोलत होते. केशव(भाई) रेडकर, बाळा शिरसाट, प्रकाश पार्सेकर, माजी उपसरपंच दिलीप मुळीक, मुन्ना मुळीक, नंदू नाईक, श्रीकांत नाईक, बाबुराव(दाजी) पार्सेकर, शंकर पार्सेकर, संतोष मुळीक, तातो सावळ, बाळा रेडकर तसेच अंगणवाडी सेविका प्रियांका पार्सेकर, पूर्वा नाईक, मानसी सातार्डेकर, पुष्पलता नाईक, संगिता माळकर उपस्थित होते. अंगणवाडी सेविका समीक्षा नाईक व मदतनीस स्वराली शिरोडकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या यशाबद्धल अभिनंदन केले. बाबुराव पार्सेकर यांनी भेटवस्तू देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक बाळा शिरसाट यांनी तर आभार नंदकिशोर नाईक यांनी मानले.