*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ते तीन दिवस*
नको बावरू *सखे अशी*
गौरी आल्या परवा दिवशी
ओवाळून मी स्थापना केली
फराळानी गेली भरून कळशी
//1//
हंडा होता जरा चिमुकला
भरून ठेवला तो करंज्यांनी
पोटे भरली छोट्या लोटयांची
गेल्या सा-या खुश होऊनी
//2//
केले सारे कपाट *मोकळे*
काढल्या साड्या जरीच्या दोन
लाल जेष्ठेला हिरवी कनिष्ठेला
नाही दुखवली त्यांची *मन*
//3//
रांधून स्वयंपाक उठून लवकर
पुजल्या गौरी *सालंकृत*
नाही ठेवली कसर कुठली
जेऊन झाल्या त्या *तृप्त*
//4//
विसर्जन झाले आज सुरळीत
देव्हारा वाटतोय *सुना सुना*
आनंद सरला कसे न कळले
घरी परतल्या *लेकी सुना*
//5//
आठवण येते त्या तीन दिवसांची
असतो आनंद ओसंडून वहात
उभ्या दारात नव्या को-या कार्स
झडतात पंक्ती मिष्टान्नांच्या घरात
//6//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

