भर पावसातही फोंडाघाटच्या राजा श्री गणेश मित्रमंडळ विसर्जन मिरवणूक उत्साहात
अजित नाडकर्णी यांच्याकडून मंडळाला २५०० रुपयांचे तृतीय बक्षीस
फोंडाघाट –
श्री गणेश मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाची ७ व्या दिवसाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी मोठ्या जल्लोषात पार पडली. भर पावसातही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल-ताशांचा निनाद, भक्तिमय वातावरण आणि सजवलेली मिरवणूक हे दृश्य भारावून टाकणारे होते.
या मिरवणुकीच्या निमित्ताने अजित नाडकर्णी (शुभांजीत श्रृष्टी) यांच्या वतीने आयोजित केलेल्या “रील स्पर्धेतील” तृतीय क्रमांकाचे बक्षीस – रु. २५००/- – श्री गणेश मित्रमंडळाला प्रदान करण्यात आले. या स्पर्धेमुळे गणेशोत्सवातील सर्जनशीलता आणि डिजिटल माध्यमातील सक्रियता याला चांगला हातभार लागत असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
या रील स्पर्धेसाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत:
प्रथम बक्षीस – ₹१०,०००/-
द्वितीय बक्षीस – ₹५,०००/-
तृतीय बक्षीस – ₹२,५००/-
अनंत चतुर्दशी पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार असून, अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. अशा उत्साहवर्धक स्पर्धांसाठी माझे सहकार्य भविष्यातही राहील,” असे मत अजित नाडकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.
