You are currently viewing औद्योगिक क्षेत्राच्या बळकटीसाठी मुख्यमंत्री सावंत–पियुष गोयल यांची भेट

औद्योगिक क्षेत्राच्या बळकटीसाठी मुख्यमंत्री सावंत–पियुष गोयल यांची भेट

*औद्योगिक क्षेत्राच्या बळकटीसाठी मुख्यमंत्री सावंत–पियुष गोयल यांची भेट*

*विकसित गोवा–विकसित भारत २०४७ मध्ये नवा आयाम*

पणजी, 0३ सप्टेंबर २०२५ : राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत गोव्यातील औद्योगिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.
या भेटीची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. विकसित गोव्याला विकसित भारत २०४७ च्या अनुषंगाने मार्गक्रमण करण्यासाठी आणि उद्योग जगतातील प्रगतीसाठी मंत्री गोयल यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे.

पियुष गोयल यांनी यापूर्वीही गोव्यातील उद्योग मंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता पर्यटन, फार्मा हब, मनोरंजन सारख्या उद्योग क्षेत्रांमध्ये असल्याचा उल्लेख केला होता.

पर्यटकांना एक अनोखा अनुभव मिळवून देणाऱ्या होमस्टे पर्यटनाला चालना देणारे धोरण गोवा राज्य सरकारने तयार करावे असे आवाहन गोयल यांनी केले होते. पर्यटनासोबत औद्योगिक समन्वय, लॉजिस्टिक सुविधा, औद्योगिक व औषध क्लस्टर्स या सर्व बाबींनी गोव्यातील औद्योगिक क्षेत्राला एक नवचैतन्य मिळवून दिले असल्याचे उद्गारही त्यांनी काढले होते.

दरम्यान काल झालेल्या भेटीनंतर गोव्यातील येत्या दशकात गोवा केवळ पर्यटन राज्य” न राहता तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, अन्न प्रक्रिया आणि नवउद्योगांचा जागतिक हब बनण्यासोबत पर्यावरणपूरक धोरणे, आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा आणि पियुष गोयलसारख्या नेत्यांचा पाठिंबा यामुळे गोव्याचे औद्योगिक भविष्य समृद्ध, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा