You are currently viewing अशीच होती आमची अवस्था

अशीच होती आमची अवस्था

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अशीच होती आमची अवस्था*

 

अशीच होती आमची अवस्था

आंम्हीही सुंदर दिसलो असतो

नव्हती जरी ती चड्डी *जीनची*

ठीगळे पुरेशी *मिरवत होतो*

//1//

जरा उसवली तरीही घातली

श्रीमंती ना कुठेच *नडली*

गरज आमची भागत होती

शान न आमची *कधी गेली*

//2//

वापरून वापरून सारे कपडे

पैसेही झाले आमचे *वसूल*

नाही भांडलो आंम्ही भावंडे

असून कमी अधीक *स्थूल*

//3//

आज असली शोरूम आमची

सांभाळली जबाबदारी त्यावेळी

साती भावंडे ओळखली जातो

दुकानांची आहे *मोठी साखळी*

//4//

गिऱ्हाईक मागते अशीच चड्डी

पाहून आमचा *ट्रेड बाॅय*

नाही वापरत *चड्डी* दादाची

*खिशातला पैसा बोलतो हाय*

//5//

होता जमाना एके काळी

वापरत होती खालची भावंडे

विचित्र आहे जमाना आताचा

भांडाला नाहीत घरी *भावंडे*

//6//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा