*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भूतकाळाचे ठसे..माझे शब्द..!!*
वास्तव आभासी सीमारेषा
शब्दचं …धूसरं करतात
जुगाराचे उलटे फासे
इतिहासाचे कवडसे फेकतात..
वर्तमानात जगायला हवं
शब्दांना ते….मान्य नाही
भावनिक प्राक्तन भूतकाळाचं
सुटल्या.. सुटत नाही..
स्नेहाळ संस्कार पेरले
शब्दांनी..भूतकाळाच्या पिंजऱ्यात
शब्दांची ..स्फूर्ति ..शब्द..व्याप्ती
अडकली..भविष्याच्या मायाजालात
हेचं..तर..जगणं असतं
जेष्ठ मनाने..श्रीमंती दाखवावी
न्हाणं आलेल्या… अक्षरांना
ओल्या मायेने ..शब्दांना माखावी
नसानसांतून भरले.. शब्द
भूतकाळात ठसे उमटले
जगणं हेचं..माझ्या शब्दांचं
जीवेभावे अंगावर बरसले..
बाबा ठाकूर
