You are currently viewing कुडाळात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भाजपाच्या वतीने भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन..

कुडाळात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भाजपाच्या वतीने भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन..

कुडाळ :

 

कुडाळ तालुका भाजपच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मा. श्री. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 70 ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहेत. तसेच तिरंगी डबलबारी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्कारामध्ये रिक्षा व्यावसायिक, मूर्तिकार आणि इतर ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

हा सत्कार कार्यक्रम भाजपच्या कुडाळ कार्यालयासमोर भव्यदिव्य मंडप उभारून 9 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या वेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा भव्यदिव्य असेल असे विनायक राणे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी केले आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम असेल असा दावा भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 15 =