You are currently viewing अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपी रुपेश घाडीगावकरला ५० हजाराच्या जामिनावर सुटका

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपी रुपेश घाडीगावकरला ५० हजाराच्या जामिनावर सुटका

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपी रुपेश घाडीगावकरला ५० हजाराच्या जामिनावर सुटका

सिंधुदुर्ग

घरात घुसून अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी रुपेश घाडीगावकरा याची दिनांक २९/०८/२०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. V.S. Deshmukh यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला. आरोपीच्या वतीने तर्फे ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जामिनावर मुक्तता केला तसेच ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव, व ॲड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले.*
कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिष्टर नं. २६०/२०२५ चे कामी आरोपी यांचेवर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७४(१)(i), ७८, ३२९(३), ११५(२), ३३२(बी) सह बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम चे कलम ८, ११(४), १२ अन्वये गुन्हा दाखल झालेला असून आरोपी याला दिनांक ११/०८/२०२५ रोजी अटक करण्यात आली.
२) सदर गुन्ह्याच्या कामी फिर्यादी हिने आरोपी (अर्जदार) यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७४(१) (i), ७८, ३२९(३), ११५(२) ३३२(बी) सह बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम चे कलम ८, ११(४), १२ अन्वये दिनांक ११/०८/२०२५ रोजी कुडाळ पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीची हकीकत अशी कि, सदर फिर्यादीत आरोपी हा पिडीतेला अश्लील स्वरूपाचे म्यासेज करत होता व दिनांक १०/०८/२०२५ रोजी पिडीतीच्या राहत्या घरातून तिला बाहेर ओडून घेऊन जाताना तिच्या बरोबर अश्लील वर्तुणूक केली व तिच्या मनात लज्या उत्पन होईल असे कृत्य करून आरोपी हा त्या ठिकाणावरून पळून जात होता.
३) आरोपियांस दि.११/०८/२०२५ रोजी रिमांड रिपोर्ट समवेत कुडाळ येथील मे.न्यायालयात हजर करून आरोपिची दोन दिवसांचा पोलीस कस्टडीची मागणी केली असता मे. न्यायालयाने आरोपि याला ११/०८/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश केला.
४) आरोपी यांस दि.१२/०८/२०२५ रोजी रिमांड रिपोर्ट समवेत कुडाळ येथील मे.न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली असता मे.न्यायालयाने पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सदरचा गुन्हा सेशन ट्रायबल असल्या कारणाने त्या गुन्ह्याच्या कामी आरोपी तर्फे ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी जिल्हा न्यायालयात दिनांक २०/०८/२०२५ रोजी दाखल केला व त्याची सुनावणी २९/०८/२०२५ रोजी झाली. मे न्यायालया समोर झालेला युक्तिवाद मे. न्यायालयाने ग्राह्य मानून व दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार करून आरोपीला योग्य त अटी-शर्तीवर व रक्कम रु ५० हजार रक्कमेच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव, व ॲड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले

प्रतिक्रिया व्यक्त करा