यमुनानगर, निगडी-
दानात दान श्रेष्ठ रक्तदान सुखकर्ता मित्र मंडळ यमुना नगर निगडी किर्लोस्कर कॉलनी यांच्या वतीने २५ व्या रौप्य महोत्सवी गणपती महोत्सव निमित्ताने भव्य कास्य थेरपी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये ३० नागरिकांनी रक्तदान केले ८० जणांनी कास्य थेरपीचा लाभ घेतला. सुखकर्ता मित्र मंडळ नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत असते. यावर्षी विविध गुणदर्शन, फन फेअर, कास्य थेरपी व रक्तदान शिबिर, संगीत खुर्ची, चित्रकला, रांगोळी, मैदानी खेळ व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा. गजानन ढमाले व यमुना नगर मधून सर्व जेष्ठानी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद उपभोगला. यमुना नगर किर्लोस्कर कॉलनीतील सर्व बंधू भगिनींनी व लहान मुलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
मंडळाचे अध्यक्ष मा. गणेश तिवारी, उपाध्यक्ष ऋषिकेश कोंढाळकर, खजिनदार अभिषेक वाळके, कार्याध्यक्ष कृष्णकांत खोल्लम, सचिव भालचंद्र बागल व त्यांच्या सर्व टीमने अहोरात्र अथक परिश्रमाने हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.
महाप्रसाद, सत्यनारायण महापूजा, बक्षीस समारंभ व मिरवणुकीने या कार्यक्रमाची सांगता झाली.
