You are currently viewing माय माहेरवाशीण

माय माहेरवाशीण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’ माय माहेरवाशीण ‘*

 

आली गौराई माहेरी

सोन्या मोत्यांच्या पावली

तिचे येणे मांगल्याचे

गणरायाची माऊली ||

 

आली माहेरवाशीण

कोड कौतुक मायेचे

ताट सजे नैवेद्याचे

केले रांधण प्रेमाचे ||

 

ज्ञान आरोग्य सन्मती

क्षेम हीत कुटुंबाचे

समृद्धीचे वरदान

तिच्या शुभ आशीर्वचे ||

 

तिच्या कृपेने जीवनी

नाही कशाची ददात

ठेव माऊली सुखात

घरदार गणगोत ||

 

देई माये सकलांना

तुझी छत्रछाया शिरी

राही सुबत्ता नात्यांची

माझ्या भरल्या संसारी ||

 

माझी माऊली दयाळु

कृपा करी सर्वांवरी

तुझ्या समृद्धीच्या खुणा

ठेव आई घरी दारी ||

 

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा