*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझी गौराई गौराई*
आली गौराई माहेरी
तिला लिंबलोण करा
किती दिसते मोहक
ओटी नारळाने भरा।
भाद्रपद महिन्यात
शुक्ल पक्ष सप्तमीला
अली गौराई गौराई
हर्ष मनात दाटला।।
माझी गौराई लाडाची
तिला छान नटवून
हार गजरे घालते
बाळे पुढ्यात ठेवून
दारी फुलांचे तोरण
छान सजवू मखर
पुढे दिव्यांची आरास
प्रकाशात न्हाले घर
विडे पेढे फुलवात
करा पूजेची तयारी
करु प्रसन्न अंबेला
सुख लाभेल संसारी
लाडू करंज्या चकल्या
पंचपक्वानांचे ताट
महालक्ष्मी भोजनाचा
करू खूप थाटमाट
पुरणाचा, आंबिलीचा
घास तिला भरवावा
सवाष्णींना मान द्यावा
रात्री जागर करावा
करू मायेचे शिंपण
माझ्या जेष्ठ गौराईचे
जाई सासरला उद्या
मन उदास आईचे
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३

