*ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*विद्यमान उपसरपंच नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून 2017—18 पासून सदर उपक्रमात सुरुवात*
*सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कार्यकारणी सदस्य व ग्रामविकास अधिकारी प्रशांत जाधव यांच्या विशेष सहकार्य व पाठिंबामुळे कार्यक्रम यशस्वी*
*वैभववाडी–*
ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे हद्दीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा 29 ऑगस्ट 2025 रोजी रवळनाथ मंदिर येथे संपन्न झाला. या सन्मान सोहळ्याला विद्यार्थ्यांसहित पालक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल 50 विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या स्थळी करण्यात आला तर गावातील काही समाजसेवक यांचे सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजपा तालुका सरचिटणीस संजय सावंत, भाजपा तालुका पंचायत समिती शक्ति केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, भाजपा कार्यकारणी सदस्य माजी सरपंच विजय रावराणे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवलराज काळे, ग्रामपंचायतीचे सदस्य विलास जंगम, ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप महिला बूथ अध्यक्ष सौ विशाखा काळे,भाजपा बूथ अध्यक्ष प्रकाश रावराणे, पोलीस पाटील महेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी प्रशांत जाधव यांनी केले. ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच श्री नवलराज विजयसिंह काळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत सदस्य पदावर पहिल्यांदा विराजमान झाल्यानंतर 2017–2018 या आर्थिक वर्षात हा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा चालू झाला हागुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दरवर्षी संपन्न होतो. अवघ्या दहा ते पंधरा विद्यार्थ्यांचा त्यावेळी पेन आणि वही देऊन सन्मान सोहळा चालू केला होता त्या सोहळ्याचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार होऊन आज 2025 साली तब्बल ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र फाईल पॅड वह्या पेन अशा प्रकारचे साहित्य देऊन ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला आणि या कार्यक्रमाला तळागाळातील सर्व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावामध्ये विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकांचा नागरिक सत्कार करण्यात आला सत्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. श्री किशोर मधुकर रावराणे, प्रमोद बाळकृष्ण रावराणे, विठ्ठल त्र्यंबक रावराणे शिवराम धामणे व ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पदावर राहून घर संसार व्यवसाय सांभाळून समाजकार्यात झोकून देऊन काम केल्याबद्दल ग्रामपंचायत स्तरावरून व पुणे येथील संपन्न झालेल्या अहिल्याबाई होळकर सामाजिक व शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात अहिल्या रत्न पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल सौ विशाखा नवलराज काळे यांना गौरव पत्र शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांनी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढे जाऊन तुम्ही ग्रामपंचायत मध्ये विकासाला हातभार लावावा पुढे जाऊन तुम्ही आज सन्मान घेणारे हात बनला आहात उद्या सन्मान देणारे हात बना अशा प्रकारचं काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा ग्रामपंचायतीच्या वतीने श्री काळे यांनी दिल्या.
यावेळी भाजपा उपाध्यक्ष जिल्हा प्रमोद रावराणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले पंचक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध राहून कार्य करू खोरीला न्याय देण्याचं काम सर्वांना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यासाठी आपल्या सर्वांच शक्ती बळ आमच्या पाठीशी आजपर्यंत आहे तसे यापुढे राहू दे अशा प्रकारचं आवाहन प्रमोद रावराणे यांनी जनतेला केले. प्रशांत जाधव यांनी सूत्रसंचालन करत उपस्थित मान्यवरांचे आभार मानत ग्रामपंचायत पुढील प्रमाणे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करेल उद्या भविष्यात अनेक विद्यार्थी गुणवंत व्हावे याबाबत ग्रामपंचायत कडून विशेष उपक्रम राबवले जातील असे सांगत त्यांनी आभार प्रदर्शन मानले.
यावेळी गावातील समाजसेवक ग्रामस्थ किशोर रावराणे, प्रमोद रावराणे, दत्ताराम रावराणे, विठ्ठल काटे,जितेंद्र सावंत योगेश,सावंत,महादेव सावंत, मंगेश उर्फ भाई माने, वासुदेव साटम, प्रकाश साटम, नाना राणे,आत्माराम रावराणे, भास्कर सावंत, संदेश डांगे, प्रकाश दळवी,सुभाष डांगे, रामचंद्र बोडेकर, अंबाजी बोर्डेकर, लक्ष्मण बोडेकर, संजय बोडेकर, बाळकृष्ण डांगे, बाबुराव रावराणे, चंद्रकांत जंगम, प्रकाश शिंदे, महेश डेळेकर, श्री पारखे, मंगेश चव्हाण,गुणवंत विद्यार्थी स्नेहा बोडेकर, सानिका डांगे,मानसी डांगे, मंदार काळे, तुषार बोडेकर, प्रिया बोडेकर, सिद्धी राऊत, सानिका चव्हाण, दीक्षा गायकवाड, प्रगती साटम, कराटे चॅम्पियन कृष्णाई नंदकिशोर गावरान, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, ग्रामपंचायत पाणी कमिटी कर्मचारी अशोक पाटील, आरोग्य सेवक श्री बोडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर मॅडम, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री पाटील व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
