You are currently viewing पहातो रोज आभाळ

पहातो रोज आभाळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

पहातो रोज आभाळ

पांघरतो स्वप्नांची चादर

पोटात कळकळते भूक

डोळ्यातून वाहतो सागर

 

अपेक्षेने पेरतो

वादळ वारा वाहून नेतो

गर्भार होते माती

पाऊस दगा देतो

 

भार कर्जाचा डोक्यावर

पण हाती काय येत

डोळ्यांदेखत भविष्य

बेचिराख होत रहातं

 

रात्र कुशीत घेते

पण झोप लागत नाही

दिवस रोज उजाडतो

पण अंधार संपत नाही

 

विनंती एकच राव

एकदा तरी हमीभाव द्या

श्रीमती नको मला

सुखाने जगू द्या

 

जगाचा पोशिंदा म्हणतात

पण दुष्काळाच्या सावलीत जगतो

या झोपडीत माझ्या

फक्त चंद्राचाच उजेड असतो

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा