You are currently viewing आयुष्याच्या मैफलीत

आयुष्याच्या मैफलीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्याच्या मैफलीत*

 

गीत गाते जीवनाचे

मैफिलीत आयुष्याच्या

किती रहस्ये दडली

कोपऱ्यात ह्या मनाच्या- – १

 

 

प्रत्येकाच्या संसारात

अनुभव कडू गोड

साक्षी ठेवावे देवाला

नको बोल सडेतोड – – २

 

सूर जुने गीत नवे

गावे नित्य आनंदात

मोठेपण दडलेले

आपल्याच संघर्षात — ३

 

खंत नसावी मनात

नको संतापाची कळ

घ्यावे आम्ही जुळवून

मिळे सौहार्दाचे बळ —-४

 

 

आयुष्याच्या मैफिलीत

आज गाणार भैरवी

विश्वासाचा हातभार

मला हिम्मत पुरवी

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा