*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*सारस बाग –तळ्यातला गणपती*
सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान
हे गणपती मंदिर नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले असून मंदिरात अतिशय सुरेख अशी संगमरवरी गणेश मूर्ती आहे….
सकाळ-संध्याकाळ नियमित होणारी पूजाअर्चा.. सुबक, देखण्या मूर्तींची केलेली सुटसुटीत सजावट.. असे काहीसे वर्णन या तळ्यातल्या गणपती मंदिरांचे करता येईल. या मंदिराने अजूनही साधेपणा जपला आहे..
तेथील प्रसन्न वातावरण मनाला भावते. मन प्रसन्न करते..
पुण्यात थंडीचा चांगलाच कडाका वाढला की सारस बागेतील गणपतीला रिवाजाप्रमाणे थंडीसाठी लोकरीचा स्वेटर आणि लोकरीची टोपी असा पोशाख केला जातो. गेली अनेक वर्षे ही प्रथा पाळली जात आहे.. रात्री बाप्पाला स्वेटर आणि टोपी चढविली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी काढली जाते. सात दिवसांचे सात रंगाचे स्वेटर बाप्पासाठी तयार असतात. रात्रीच्या थंडीत स्वेटर टोपी घालून सजलेले गणपतीचे हे लोभस रूप .. या गणपतीचे हे खास वैशिष्ट्य…. हे खास वैशिष्ट्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात..
सारस बागेतील रम्य परिसर बघण्यासारखा आहे. तर सारसबागेतील प्रसिध्द भेळ..
सारसबागेत गेलात आंणि भेळ खाल्ली नाही असं कधीच होणार नाही.. ती खाल्ली नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही.
सारसबागेत तळ्यातील टेकाडावर बाग काढून सुंदर आणि भव्य गणपतीचे मंदिर उभे आहे. कडेच्या तळ्याच्या जागी सुंदर बाग करण्यात आली आहे… मंदिराचा परिसर पानाफुलांनी नटलेला आहे.. कमळाच्या रंगीबेरंगी फुलांनी फुललेले तळे मनमोहक दिसतात…
डोळ्यात भरेल असं सुंदर मंदीर देवदेवेश्वर संस्थानने बांधलं आहे.
मी पुण्यात आली आणि सारसबागेत गेली नाही हे अशक्यच.. ! सुंदर बाग,
पक्ष्यांचे किलबिलणे, मध्ये जाऊन पायऱ्या चढून वर जाणे आणि समोर भव्य मंदीर… हे बघितल्यावर अहाहा..! सुंदर…! इतकेचं शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात. पुढे गेलं की गजाननाचे सुंदर रुप मन मोहवून टाकते व आपसूकचं आपले हात जोडले जातात आणि मुखातुन शब्द बाहेर पडतात… व्वा..!!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
