You are currently viewing मूलमंत्र

मूलमंत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मूलमंत्र*

*********

तृप्ततेत कृतार्थता जीवनाची

हे आतातरी उमजले पाहिजे

 

काळ धुंदला उमेदीचा सरला

आता कुठेतरी थांबले पाहिजे

 

जरी वयस्क ,मनाने तरुण मी

सभोवताला , निरखुनी आहे

 

जगता जगता जग मी पाहिले

साऱ्यांच्यात मी सावरलो आहे

 

गतजन्मांचे ऋणानुबंध भाळी

प्याले अनुभवांचे रिचवीत आहे

 

मीत्व , सोडुनी आनंदा शोधावे

हाच जगण्याचा , मुलमंत्र आहे

************************

*रचना क्र. ६० / १ / ४ /२०२४*

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =