You are currently viewing कणकवलीतील युवकाची आत्महत्या…!

कणकवलीतील युवकाची आत्महत्या…!

कणकवलीतील युवकाची आत्महत्या…!

कणकवली :

शहरातील – निम्मेवाडी येथील मिलिंद प्रकाश तावडे (३६) याने घराच्या मांगरात लाकडी बाराला गळफास घेऊन‌आत्महत्या केली. ही घटना ऐन गणेश चतुर्थीदिनी, बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिलिंद याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.

मिलिंद बुधवारी रात्री आरतीसाठी येणाऱ्या मंडळींसाठी बाजारातून प्रसाद घेऊन घरी आला. प्रसाद देऊन घरातून निघालेला‌ मिलिंद आरतीसाठी घरी आला नव्हता. त्यानंतर त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला असता घरामागील मांगरात एका लाकडी बाराला त्याच्या मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती समजताच कणकवली पोलिसांनी घटनस्थळी दाखल होऊन पंचनाम केला. मिलिंद प्लंबिंगची कामे करायाचा. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहीत बहीण असा परिवार आहे. मिलिंद याने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण कळू शकले नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी ही घटना घडल्याने निम्मेवाडीत शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा