*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गणराज आले*
आले आले हो गणराज आले
गणेश चतुर्थीला आगमन झाले
मुर्ती रूपात गजमुख आले
भक्तगण स्वागताला तयार झाले
ढोलताशे वाजतगाजत आले
भक्त नाचत जयघोष करू लागले
दहा दिवस मुक्कामी गणराज आले
मुषकावर स्वार होऊन आले
भक्तांचे रक्षण करण्या आले
संकट हरण करण्या आले
पुष्प दुर्वा सुवास घेण्या आले
लाडू मोदक प्रसाद खाण्या आले
धुप दिप आरतीला प्रसन्न झाले
भक्तांना आशिर्वाद देण्यास आले
गणराज गणपती गजानन आले
गौरीनंदन भालचंद्र विनायक आले
एकदंत शुर्पकर्ण वक्रतुंड आले
लंबोदर हेरंब शिवसुत आले
गणेशोत्सव उत्साहात साजरे झाले
चतुर्दशीला निरोप देऊन विसर्जन केले
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
पुढच्या वर्षी लवकर या…! लवकर या…!
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
