*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“शिव गौरी”*
अन्नपूर्णा देवीचे करू नित्य पूजन
भुकेल्याला करते तृप्त गौरी प्रेमानंIIधृII
गौरी भौतिक समृद्धी देवता अनन्य
देई अन्नधान्य वात्सल्य संपत्ती धन
मांगल्य कौटुंबिक सौख्य करी प्रदानII1II
शिव म्हणाले ब्रह्म सत्य मिथ्या जगत
गौरीला आला राग शिवांशी संवादात
शिवा तत्व न पटून गौरी पावली अंतर्धानII2II
गौरी गुप्त होता विश्र्वांतील संपले चैतन्य
गोडवा उडाला हरपले सौख्य घरपण
अकस्मात संपले जगातील अन्नधान्यII3II
विश्वातील सर्वांची दशा जाहली अन्नांन्न
शिवाला करिती याचना खायला द्यावे अन्न
शिव प्रार्थी पार्वतीला प्रजेला द्यावे अन्नII4II
रुक्मिणी द्वारकेतील सर्वांना देई भोजन
सुदामा पत्नी रांधून सर्वांना देई भोजन
सर्व देवींना वंदन होई सर्वांचे कल्याणII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

