You are currently viewing सिंधुदुर्गच्या नव्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे.

सिंधुदुर्गच्या नव्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे.

सिंधुदुर्गच्या नव्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे.

विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त.

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्गचे विद्यमान जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, भाप्रसे यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या जागी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांची शासनाने नियुक्ती केली आहे.
केली आहे. त्यामुळे त्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून ३१ऑगस्ट रोजी शासनाच्या आदेशानुसार कार्यभार स्वीकारतील.
श्रीम. तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने सांगली येथे रिक्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्री.विशाल नरवाडे (भाप्रसे) यांची नियुक्ती शासनाने केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांचा कार्यकाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी समाधानकारक राहिला होता. या जिल्ह्यात चांगल्या प्रशासकीय कामाची छाप उमटवली होती. मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाचा कार्यक्रम दीडशे दिवसाचा कार्यक्रम यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. सेवेतील कार्यकाळ पूर्ण करून वयोमानाप्रमाणे या जिल्ह्यात निवृत्त होत असल्याने व गेले काही दिवस त्यांना निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा येत असल्याने जिल्हाधिकारी भवन सध्या गर्दीने गजबजून गेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा